Income Tax, ITR Filing 2024: new income tax rules


सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरासाठी अनेक नवीन नियम जाहीर केले. केंद्रीय अर्थमंत्री यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या प्रमुख घोषणांपैकी एक म्हणजे नवीन आयकर व्यवस्था ही डीफॉल्ट कर प्रणाली असेल.

* नवीन स्कीम - ( कोणतीही वजावट नाही )

वार्षिक उत्पन्न

कराचा दर

० ते ३,००,०००

नाही (Nill)

३,००,००० ते ६,००,०००

५ %

६,००,००० ते ९,००,०००

१०%

९,००,००१ ते १२,००,०००

१५%

१२,००,००१ ते १५,००,०००

२०%

१५,००,००० ते वरील सर्व

३०%
+ ४ % Health&Education Cess

* जुनी  स्कीम -

वार्षिक उत्पन्न

प्राप्ती कराचा दर

० ते २,५०,०००

नाही (Nill)

२,५०,००१ ते ५,००,०००

५ %

५,००,००१ ते १०,००,०००

रु.१२५०० + पाच लाखावरील उत्पन्नावर २०%

१०,००,००१ ते वरील सर्व

रु.१२५०० + पाच लाखावरील उत्पन्नावरील ३०%
+ ४ % Health&Education Cess



 पगारी उत्पनातून मिळणाऱ्या बजावटी *

०१) घरभाडे भत्ता : फलम १० (१३ A) :
  
 स्वतःच्या मालकीचे राहते पर नसलेल्या व एकूण वार्षिक पगाराच्या १०% पेक्षा जास्त घरभाडे देणाऱ्या कर्मचाऱ्याचा परभाडे भत्ता जास्तीतजास्त मिळणाऱ्या घरभाडे भत्त्याइतका कमी होऊ शकतो. त्यासाठी भाडे पावती लागेल. तसेच घरमालकाचे पॅन क्रमांक ही द्यावा लागेल.

०२) प्रमाणित वजावट : कलम १६ :
  प्रमाणित वजावट
रु. ५०,०००/- किंवा मिळालेला पगार यापैकी कमी असलेली रकम स्टॅण्डर्ड डिडक्शन म्हणून दोन्ही स्किममध्ये वजावटीस पात्र आहे.

०३ ) व्यवसाय कर : कलम १६ (III):
 प्रत्यक्ष भरलेल्या व्यवसाय कराची संपूर्ण वजावट या कलमाखाली मिळेल.

०४) घरबांधणी/खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज :
   कलम २४(१) (
vi): बँका/को-ऑप. बँका यांचेकडून घेतलेल्या दोन घरासाठीच्या गृहकर्जावरील व्याजाला रु. २ लाखांची वजावट मिळेल. तसेच घरदुरुस्तीसाठी किंवा टॉप अप कर्ज घरासाठी घेतले असल्यास रु. ३०,०००/- ची वजावट मिळेल.

TaX Calculate Excel File 

०५) गुंतवणूकीवरील वजावट (कलम ८० सी):
  प्रॉ. फंड
, कर बचत म्युच्युअल फंड, विमा हप्ता, पी.पी.एफ., एन.एस.सी., पायाभूत उद्योगाचे बाँड, नाभाई बाँड, शेक्षणिक फिज्, पेन्शन फंडात केलेली गुंतवणूक, सुकन्या समृद्धी योजना, घरासाठी पेललेल्या कर्जाची परतफेड, रोइपूड / नॅशनल बँकेत ५ वर्षाकरिता केलेली मुदत दल उष, ठेव. इ. मध्ये गुंतवणूक / खर्च केल्यास त्याची उत्पात्रातून वजावट मिळते. ही मर्यादा रु. १.५ लाख आहे.

गोंधळ कमी करण्यासाठी विशिष्ट योजनेत विशिष्ट गुंतवणूक करता येईल अशी मर्यादा काढून टाकली असून एका किंवा त्यापेक्षा जास्त योजनांमध्ये रु. १.५ लाखांपर्यंत गुंतवणूक / खर्च करून वजावट मिळवता येईल.

 ०५ अ ) (कलम ८० सीसीडी) :
 कलम ८० सीसीडी (२) मध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन खात्यातील केंद्र अथवा राज्य सरकारने भरलेल्या  १४% अंशदान उत्पन्नाचे निर्धारण करताना संपूर्णपणे वजावटीस पात्र आहे तसेच कर्मचाऱ्याचे स्वतःचे १०% अंशदान हे कलम ८० सी अंतर्गत वजावटीस पात्र आहे.

०६) वैद्यकीय विमा योजना (कलम ८० डी) :  
  या योजनेअंतर्गत वैद्यकीय खर्चाची भरपाई मिळण्यासाठी असणारी मेडिक्लेम पॉलिसी
' आणि वैद्यकीय तपासणीसाठी केलेला खर्च (रु.,०००/-) स्वतः, स्वतःच्या पती / पत्नी / मुले/ आई / वडिलांसाठी केलेला असेल तर रु. २५,०००/- ची सुट मिळेल.तसेच या योजनेअंतर्गत जर का व्यक्तीचे आई वडील हे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या वैद्यकीय विमा व वैद्यकीय खर्चावर रु. ५०,०००/- ची वजावट मिळेल, वरील दोन्ही प्रकारातील खर्च / हप्ते हे बँकेतून झालेले पाहिजेत.

०७) नैशनल पेन्शन स्कीम :
 कलम ८० सीसीडी (आयबी): या कलमाखाली कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्या खात्यामध्ये भरलेल्या
रु. ५०,०००/- पर्यंतच्या रकमेला सुट मिळेल.

०८) उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजावर सुट (कलम ८० ई):
 स्वतःच्या पती/पत्नी/मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता घेतलेल्या कर्जावरील भरलेल्या पूर्ण व्याजाची सुट या कलमान्वये मिळेल.

०९) अवलंबून असणाऱ्या अपंग व्यक्तीसाठी केलेला वैद्यकीय खर्च व गुंतवणूक :
  (कलम ८० डीडी): या अशा अवलंबून असणाऱ्या व्यक्तीसाठी केलेल्या खर्चाची किंवा गुंतवणूकीची वजावटीची मर्यादा
रु.७५,०००/- पर्यंत वाढविण्यात आली आहे. अपंगत्व हे जर गंभीर स्वरुपाचे (८०% किंवा जास्ती) असेल तर रु.,२५,०००/- एवढी सुट मिळेल.

 १०) अपंगत्व : (कलम ८० यु ) :
करदाता स्वतः ४०% पेक्षा जास्त अपंग असेल तर या कलमान्वये सुट रु. ७५,०००/- एवढी आहे. वरील कलमांतर्गत अपंगत्व हे जर गंभीर स्वरुपाचे (८०% किंवा जास्ती) असेल तर रु. ७५,०००/- चे ऐवजी रु.,२५,०००/- एवढी  सुट मिळेल.


TaX Calculate Excel File 

११) दीर्घ औषधोपचार लागणाऱ्या रोगाच्या उपचारासाठी वजावट : (कलम ८० डी.डी.बी.):
काही ठराविक रोगाच्या (मेंदूचे आजार, कैंसर, एड्स, हिमोफिलीया इ.) उपचारासाठी/पुनर्वसनासाठी करदात्याच्या उत्पनातून झालेला प्रत्यक्ष खर्च किंवा रु. ४०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती वजावटीस पात्र राहिल व ही सवलत मिळणेसाठी सरकारी दवाखान्यात काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे सर्टिफिकेट व खर्चाचे  पुरावे दरवर्षी द्यावे लागतील, विम्यापोटी किंवा मालकाकडून औषधोपचाराच्या खर्चापोटी काही रकम भरपाई म्हणून मिळाली असेल तर तेवढ्याने  या कलमाखालील वजावट कमी होईल. आजारी व्यक्ती ६० वर्षावरील असेल तर रु.,००,०००/- वजावट मिळेल.

१२) देणगीवरील सुट (कलम ८० जी) :
 
 मान्यताप्राप्त सार्वजनिक / सामाजिक संस्था अथवा संघटना यांना दिलेल्या देणगीच्या ५०% रकम वजावटीस पात्र राहिल, देणगी एकूण पगाराचे (गुंतवणूक, वजा जाता) १०% पर्यंतच ग्राह्य धरली जाईल. तसेच रु.,०००/- वरील देणगी ही रोखीने दिलेली असल्यास मान्य होणार नाही.

13) विजेवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांवर मिळणारी सुट (८० इ.इ.बी.):
विजेवर चालणाऱ्या  ४ चाकी वाहनांसाठी करपात्र व्यक्तीनी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतले असल्यास त्या व्यक्तीस आयकरात त्याने भरलेल्या व्याजाची  
रु.,५०,०००/- पर्यंत सुट मिळेल. (कर्ज हे १/४/२०१९ ते ३१/३/२०१३ या कालावधीत घेतलेले असावे.)

 १४) बँक व्याज  : (कलम ८० टी.टी.ए.) :
सर्व बँकेतील बचत खातेवरील करदात्याला मिळणारे व्याज रु. १०,०००/- पर्यंत करमाफ केले असून रु.१०,०००/- पेक्षा जास्त मिळणारे असे व्याज व सर्व बँकामधील ठेवींवर मिळणारे सर्व व्याज पगारात मिसळून आयकर गणना करावी लागणार आहे. १/४/२०२० पासून बँका / कंपन्याकडून मिळणारा लाभांश (डिव्हीडंड) करपात्र करणेत आला आहे. (बँकेतील ठेवींवरील व्याज  हे आपले पॅनवर ऑनलाईन दिसत आहे)

१५) (कलम ८७ ए ):
  नवीन स्किममध्ये करपात्र उत्पन्न  
रु.,००,०००/- चे आत असेल तर बसणारा आयकर किंवा रु. २५,०००/- यापैकी कमी असलेली रकम सुट मिळेल, तसेच जुन्या स्किमगध्ये करपात्र उत्पन्न रु.,००,०००/- चे आत असेल तर रु. १२,५००/- पर्यंत आयकरामध्ये सूट मिळेल.

१८) वेतन थकबाकी (Arrears) मिळाली असेल तर सुट (Relief): कलम ८९ (१) :

   फॉर्म १० ई भरुन वरील कलमाखाली आयकर कमी होऊ शकतो.

१७) आयकर कायम खाते क्रमांक (PAN) (कलम १३९ ए):
   सुधारीत आयकर कायद्याप्रमाणे एकूण मासिक पगार
रु.२०,८३३/- किंवा अधिक असेल व आयकर क्रमांक (पॅन) घेतला नसेल तर आयकर क्रमांक (पॅन) घ्यावा लागेल. सदरचे सर्व काम आता युनिट ट्रस्ट/एन. एस. डी. एल. या खाजगी संस्थेकडे दिले असून त्यासाठी आता रंगीत फोटो २, आधार कार्ड व इतर माहिती लागेल.

१८) विवरण पत्र दाखल करणे बाबत : कलम १३९ ए  (१ ए):
   आकारणी वर्ष २०२४-२५ (आर्थिक वर्ष २०२३/२४) या वर्षाकरिता
रु. ,५०,०००/- पेक्षा जास्ती अपात्र असणाऱ्या सर्व व्यक्तींना (आयकर कपात असो वा नसो) विवरणपत्र आय. टी. आर.-१ फॉर्म मध्ये ३१ जुले पर्यंत सादर करावे लागेल. उशीरा विवरणपत्र दाखल केलेस (३१ जुलै नंतर) दंड रु.५०००/- पर्यंत लागू शकतो. ५ लाखाचे वर उत्पन्न  असणाऱ्यांना विवरणपत्र ऑनलाईन ( E-Filing) भरणे सक्तीचे केले आहे.

 १९) उद्‌गम कर कपात :  कलम १९२ :  
सदर कलमान्वये मालकाने (Employer) प्रत्येक करपात्र व्यक्तीला वार्षिक आयकर किती बसतो ते काढून सदर बसलेला आयकर हा दरमहा सरासरीने १२ महिन्यामध्ये कपात करुन पगार झालेवर ७ दिवसांचे आत  बँकेत चलनाने भरणेचा आहे, न भरलेस किंवा कमी भरणा झालेस उशीरासाठी दरमहा १.२५% व्याज भरावे लागेल. तसेच दरवर्षी अखेरीस एकूण कापलेल्या करासंबंधीचे प्रमाणपत्र फॉर्म नं १६ मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ऑनलाईनवर काढून  प्रत्येक कर्मचाऱ्यास द्यावयाचे आहे.

 २०) तिमाही वेतन विवरणपत्र (फॉर्म नं. २४ फ्यू) :
 पगारातून कपात केलेल्या आयकर कपातीचे विवरणपत्र त्रैमासिक करण्यात आलेले असून दर तिमाही विवरणपत्र फॉर्म नं. २४ क्यू मध्ये तिमाही संपल्यावर ३० दिवसांचे आत म्हणजे दरवर्षी ३१ जुलै, ३१ ऑक्टोबर व  ३१ जानेवारी पर्यंत दाखल करावे लागेल व  शेवटचे तिमाही विवरणपत्र दाखल करणेसाठी अंतीम मुदत ३१ मे पर्यंतच राहिल. वरील सर्व विवरणपत्र दाखल करणेस उशीर झालेस विवरणपत्र दाखल करेपर्यंत कलम २७२ ए प्रमाणे प्रतिदिन २००/- प्रमाणे फीज  भरुन विवरणपत्र सादर करावे लागेल.

 २१) शेअर्स म्युच्युअल फंड यांच्या विक्रीवरील भांडवली नफा आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून करपात्र केलेला असून असे झालेले सर्व व्यवहार आपल्या पॅनवर ऑनलाईन दिसत आहेत.

वरील प्रमाणे आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता पगारदारांकारिता  आयकराचे सर्वसाधारण नियम आहेत.

TaX Calculate Excel File  

Previous Post Next Post