Online Salary Slip in Shalarth . प्रत्येक महिन्याची पगार स्लिप पहा व डाऊनलोड करा.


प्रत्येक महिन्यांची Salary Slip आपण ऑनलाईन पाहू शकतो.


आपण शालार्थमध्ये आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतःच्या मोबाईलवर ऑनलाईन पाहू शकतो  तसेच डाउनलोड सुद्धा  करू शकतो .

यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा 
शालार्थ ID.(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID)

Online Salary Slip पाहण्यासाठी तसेच डाउनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.

🔻सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून शालार्थ वेबसाईट वर जा. 👇


https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp
खालीलप्रमाणे लॉग इन पेज ओपन झाल्यावर खालीलप्रमाणे माहिती भरा.


वरीलप्रमाणे Username  म्हणून तुमचा शालार्थ ID टाका.
▶ आणि  Default पासवर्ड ifms123 हा टाका.
▶ त्यानंतर खाली Captcha टाका व Submit करा.



लॉग इन केल्यानंतर Old password    ifms123  हा टाका.

▶ त्यानंतर New password बनवा
(त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).

▶ तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड Save करा. Password has been changed successfully
 असा मेसेज आल्यावर  व त्या पेज वरून logout व्हा.

logout झाल्यानंतर पुन्हा लॉग इन पेज ओपन होईल.




▶वरीलप्रमाणे Username  म्हणून तुमचा शालार्थ ID टाका.
▶ तुमचा सेट केलेला नवीन  पासवर्ड टाका.
▶ त्यानंतर खाली Captcha टाका व Submit करा.


लॉग इन झाल्यानंतर तिथे Worklist टॅब दिसेल. त्याला क्लिक करा  –



EMPLOYEE CORNER ▶️
EMPLOYEE PAYSLIP ▶️ या प्रमाणे क्लिक करा.



▶ आता खाली तुम्हाला ज्या महिन्याचीSalary Slip पहायची असेल तो महिना व वर्षselect करा. व view Salary Slip वर क्लिक करा.
▶ पुढील पेजवर तुमची Salary Slipदिसेल. तेथून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकतात तसेच डाऊनलोड करू शकतात.
▶ 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip तुम्ही पाहू शकतात तसेच डाउनलोड करून Print काढू शकतात.


Previous Post Next Post