इयता नववी _ जलसुरक्षा ( नमुना _उपक्रम व प्रकल्प )

[featured]इयता नववी _ जलसुरक्षा ( नमुना _उपक्रम व प्रकल्प  )

 विद्यार्थी मित्रांनो,

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005राज्य अभ्यासक्रम आराखडाराज्य माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रम आणि पुनर्रचित माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रम 2016 नुसार तुम्ही इयत्ता नववीच्या वर्गात विविध विषयांचे अध्ययन करत आहात. माध्यमिक शिक्षण पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार शासन निर्णय क्र. संकीर्ण 2019/ प्र.क्र. (243/19) एस.डी 4 दिनांक 8 ऑगस्ट 2019 नुसार माध्यमिक शिक्षण स्तरासाठी जलसुरक्षा हा अनिवार्य श्रेणी विषय सन 2020-21 या शालेय वर्षापासून निर्धारीत करण्यात आला आहे. प्राथमिक स्तरापासून ते आतापर्यंत विविध विषयांच्या अध्ययनातून तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये विविध क्षमतांचा विकास झालेला आहे.

    तुम्हा सर्वांना माहीतच आहे की सभोवताली, पर्यावरणामध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या विविध घटकांवर आधारीत आहेत. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांनी या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविणे व त्यादृष्टीने वर्तन करणे हा मुख्य उद्देश सुद्धा अभ्यासक्रमाने निश्चित केलेला आहे. तोच उद्देश समोर ठेवून जलसुरक्षा या विषयाची मांडणी करण्यात आलेली आहे. जलसुरक्षा या विषयाचे अध्ययन करताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूची परिस्थिती, संबंधित घटक यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे लागेल. या विषयातील विविध संकल्पना, संबोध, तत्त्वे सिद्धांत तत्वे समजून घ्या व त्यांची दैनंदिन व्यवहाराशी सांगड झाला. जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापनजलगुणवत्ता या प्रमुख घटकांचा समावेश या विषयामध्ये करण्यात आला आहे. जलसुरक्षा विषयाची मांडणी करताना पाठ्यपुस्तक व कार्यपुस्तिका अशी रचना करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक हे विषयाच्या संपूर्ण माहितीचे असणार आहे तर कार्यपुस्तिका ही तुम्ही करावयाच्या सर्व कृती व उपक्रम यांची म्हणजे उपयोजनाची आहे.

  कार्यपुस्तिका ही प्रामुख्याने पाठ्यपुस्तकावर आधारित करावयाच्या कृतींसाठी देण्यात आलेली. जलसुरक्षेतील विविध संकल्पना, संबोध, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना कृती, प्रयोग, उपक्रम व प्रकल्प काळजीपूर्वक करा. निरीक्षणे घ्या, माहितीचे संकलन करा. या सर्वांवर चर्चा करून तुम्ही केलेल्या सर्व कृती, उपक्रम व प्रकल्पांच्या नोंदी काळजीपूर्वक तुमच्या शिक्षकांच्या, पालकांच्या मार्गदर्शनाखाली या पुस्तिकेत नोंदवा. तुम्ही अभ्यासलेल्या आणि प्रत्यक्ष केलेल्या कार्याचे एक उत्तम असे शैक्षणिक साहित्य तयार होणार आहे. यामुळे तुमच्यामध्ये संशोधक वृत्ती विकसित होण्यास निश्चितच मदत होईल.

  आजच्या तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात संगणक, स्मार्टफोन हे तर तुमच्या परिचयाचे आहेत. त्यामुळे जलसुरक्षा भाग 1 या पाठ्यपुस्तकातून अध्ययन करताना माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांचा सुयोग्य वापर करा. कृती व प्रयोग करताना विविध उपकरणे, महत्त्वाचे साहित्य हाताळताना काळजी घ्या व इतरांनाही काळजी घ्यायला सांगा. कृती, निरीक्षणे करताना पर्यावरण संवर्धनाचा ही प्रयत्न करा. वनस्पती, प्राणी यांना इजा त्यांची हानी होणार नाही याची काळजी घ्या. हे वेबपेज वाचताना, अभ्यासताना आणि समजून घेताना तुम्हाला त्यातील आवडलेला भाग तसेच अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, पडणारे प्रश्न आम्हाला जरूर कळवा. तुम्हाला तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा..

: मूल्यमापन योजना :

जलसुरक्षा हा विषय इयत्ता नववीसाठी अनिवार्य श्रेणी विषय म्हणून निर्धारीत करण्यात आलेला आहे. या विषयाची मांडणी ही पाठ्यपुस्तक व कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) अशा स्वरूपात करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तकामध्ये जलसुरक्षा, जलसंधारण, जल व्यवस्थापन व जल गुणवत्ता या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर कार्यपुस्तिकेमध्ये चार प्रमुख घटकांवर आधारीत करावयाच्या सर्व कृती, उपक्रम आणि प्रकल्पांचा समावेश आहे. करावयाचे उपक्रम आणि प्रकल्प यांची निश्चिती करून देण्यात आलेली आहे. त्याविषयी सुचना आणि मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या विषयाच्या संपूर्ण अध्ययनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कृती, उपक्रम आणि प्रकल्प यांचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलप्रमाणे मूल्यमापन योजना निश्चित करण्यात येत आहे.

अ.क्र

तपशील

प्रथम सत्र               

द्वितीय सत्र

गुण

 

1

 

उपक्रम

घटक 1 मधील कोणतेही 2

घटक 3 मधील कोणतेही 2

 

40

घटक 2 मधील कोणतेही 2

घटक 4 मधील कोणतेही 2

प्रत्येकी 5 गुण प्रमाणे एकूण गुण 20

प्रत्येकी 5 गुण प्रमाणे एकूण गुण 20

 
2

 
प्रकल्प

घटक 1 व 2 मधील कोणताही 1

घटक 3 व 4 मधील कोणताही 1

 
30

15 गुण

15 गुण

 
3

तोंडी / लेखी परीक्षा

घटक 1 व 2 च्या आशयावर आधारीत प्रश्नांचा समावेश 10 गुण

घटक 3 व 4 च्या आशयावर आधारीत आधारीत प्रश्नांचा समावेश 10 गुण

 
20


4

उपक्रम व प्रकल्प नोंदवही

घटक 1, 2, 3 व 4 वर आधारीत उपक्रम व प्रकल्प अहवाल लेखन-

 जलसुरक्षा कार्यपुस्तिका 10 गुण


10

जलसुरक्षा विषयाचे एकूण मूल्यमापन

100 गुण

श्रेणी


1.  सत्रनिहाय जलसुरक्षा विषयाच्या मूल्यमापन नोंदी कराव्यात.
2. उपक्रम व प्रकल्प नोंदवही मूल्यमापन संदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने निर्धारीत केलेली जलसुरक्षा कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जमा करून घ्यावी.
3. उपरोक्तप्रमाणे एकूण 100 गुणांपैकी प्राप्त गुणांचे श्रेणीत रूपांतर करण्यात येईल.
4. , , श्रेणी उत्तीर्णता तर ड श्रेणी अनुत्तीर्णता दर्शवेल.
विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी एक आदर्श उपक्रम व प्रकल्प नोंदवही pdf च्या माध्यमातून देत आहोत. या pdf चा उपयोग आपल्याला जलसुरक्षा कार्यपुस्तिका सोडवताना तसेच उपक्रम व प्रकल्प तयार करताना निश्चित मार्गदर्शक ठरेल. असा आम्हाला विश्वास आहे. 



जलसुरक्षा पाठ्यपुस्तक 👉


नमुना सोडवलेली जलसुरक्षा (उपक्रम व प्रकल्प कार्यपुस्तिका ) 👉



जलसुरक्षा गुणदान तक्ता 👉


 Download Guide Download pdf


Previous Post Next Post