Type Here to Get Search Results !

वार्षिक परीक्षा / संकलित चाचणी- २ व नियतकालिक मुल्यांकन चाचणी (PAT) वेळापत्रक_ Summative Test- 2 and PAT Time table

 


राज्यातील सर्व शाळांमध्ये इ. १ ली ते ९ वी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा / संकलित मूल्यमापन / PAT चाचण्यांचे  एकाच वेळी आयोजन

      राज्यातील शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वी वर्गाच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस अथवा एप्रिल महिन्यांमध्ये शाळास्तरावरुन घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरु असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही. अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन वर्षा अखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो. तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. सबब, राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी व उपलब्ध वेळेचा पुरेपुर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा यासाठी राज्यातील शाळांमध्ये वार्षाअखेरीस घेण्यात येणारे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याचे विचाराधीन आहे.

       राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी- १ व संकलित
मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन चाचण्यांचे आयाजन करण्यता येणार आहे. त्यासोबत चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी समान ठेवण्यासाठी याद्वारे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

    सन. २०२४-२५ मध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी वार्षिक परीक्षा व
संकलित चाचणी- २ (नियतकालिक मूल्यांकन चाचणी - PAT) आयोजनाबाबत वेळापत्रक खालीलप्रमाणे
देण्यात येत आहे.

वार्षिक परीक्षा / संकलित चाचणी- २ व नियतकालिक मुल्यांकन चाचणी (PAT) आयोजनाबाबत
वेळापत्रक २०२४-२५
इयत्ता १ ली ते ९ वी (लेखी मूल्यमापनाकरिता) (राजमंडळ संलग्न सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी


अ.न. दिनांक इयत्ता 1 ली, 2 री इयत्ता 3 री, 4 थी इयत्ता 5 वी इयत्ता 6 वी 7 वी इयत्ता 8 वी. इयत्ता 9 वी.
1 08/04/2025 - - - - प्रथम भाषा (संकलित चाधणी-२ PAT-3) प्रथम भाषा (PAT-3)
2 09/04/2025 - - प्रथम भाषा (संकलित चावणी-रा (PAT-3) - इंग्रजी (तृतीय भाषा (संकलित चाचणी- २) (PAT-3) इंग्रजी (तृतीय भाषा) (PAT-3)
3 11/04/2025 - - इंग्रजी (तृतीय भाषा) (संकलित चाचणी- २) (PAT-3) - गणित (संकलित चाचणी- २) (PAT-3) गणित भाग- (PAT-3)
4 19/04/2025 - - गणित (संकलित चाचणी-र (PAT-3) प्रथम भाषा (संकलित चाचणी-२) (PAT-3) प्रथम भाषा (वार्षिक परीक्षा) गणित भाग-२ (PAT-3)
5 21/04/2025 - - प्रथम भाषा (वार्षिक परीक्षा) गणित (संकलित धाचणी- २) (PAT-3) द्वितीय भाषा /संयुक्त भाषा (वार्षिक परीक्षा) -
6 22/04/2025 - प्रथम भाषा (संकलित चाचणी-२) (PAT-3) द्वितीय भाषा /संयुक्त भाषा (वार्षिक परीक्षा) द्वितीय भाषा /संयुक्त भाषा इंग्रजी (तृतीय भाषा (वार्षिक परीक्षा) -
7 23/04/2025 प्रथम भाषा (संकलित चाचणी-२) इंग्रजी (तृतीय भाषा ) (संकलित चाचणी-२) (PAT-3) इंग्रजी (तृतीय भाषा) (वार्षिक परीक्षा) इंग्रजी (तृतीय भाषा (संकलित बाचणी-२) (PAT-3) गणित (वार्षिक परीक्षा) -
8 24/04/2025 गणित (संकलित चाचणी-२) गणित (संकलित चाचणी-२) (PAT-3) गणित (वार्षिक परीक्षा ) विज्ञान (संकलित चाचणी-२) विज्ञान (वार्षिक परीक्षा) -
9 25/04/2025 इंग्रजी तृतीय भाषा (संकलित चाचणी-२) परिसर अभ्यास भाग १ व २ (संकलित चाचणी-२) परिसर अभ्यास भाग १ व २ (वार्षिक परीक्षा )सामाजिक शास्त्रे (संकलित चाचणी-२) सामाजिक शास्त्रे  (वार्षिक परीक्षा ) -


सर्वसाधारण सूचनाः

  •  संकलित मूल्यमापन २ साठी परीक्षांचे आयोजन शाळा स्तरावरुन करण्यात येईल तथापि त्यांसाठी यासोबत दिलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्यात यावा.
  •  शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना PAT अंतर्गत इयत्ता ३ री ते ९ वी साठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी संकलित मूल्यमापन- २ च्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाकडून पुरविण्यात येतील. इतर व्यवस्थापनाच्या शाळांना सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करावयाच्या आहेत.
  • इयत्ता १ली व २ री साठी सर्व विषयांच्या व इ. ३ रीरी तेते ९९ वीवी अन्य अ्य विषयांच्या संकलित चाचणी - २/लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करावे.
  • इयत्ता ९ वी साठी PAT शिवाय अन्य विषयांसाठी वेळापत्रक यासोबत देण्यात आलेले नाही ते शाळास्तरावरून ठरविण्यात यावे.
  • वेळापत्रकात नमूद न केलेल्या (कलाशिक्षण, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, इत्यादी) श्रेणी विषयांच्या मूल्यमापनाचे नियोजन शाळास्तरावर करण्यात यावे.
  •  शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना PAT अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा वापर करूनच त्या विषयाची संकलित चाचणी - २ घ्यावयाची आहे. इतर विषयांसाठी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून संकलित चाचणी- २ घेण्यात यावी.
  •  तथापि, इयत्ता ५ वी व ८ वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा शासन निर्णय दि. ०७/१२/२०२३ मधीलतरतूदीनुसार स्वतंत्रपणे शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्यावयाची आहे. PAT३ अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही.

    टीप- इ.५ वी व इ.८ वी मधील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी दोन प्रश्नपत्रिका सोडावाव्या लागतील. त्यानुसार नियोजन करावे. इयत्ता पाचवी व आठवी वगळता अन्य इयत्तांकरिता कोणत्याही विषयांची दुबार परीक्षा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

  •  शाळेच्या स्थानिक वेळेनुसार (सकाळ सत्र / दुपार सत्र) परीक्षेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य शाळांना राहील. तथापि यासोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार त्या विषयाची परीक्षा त्याच तारखेस हईल याची दक्षता घ्यावी.
  •  तोंडी /प्रात्यक्षिक परीक्षा त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी अथवा उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
  •  संकलित चाचणी- २ च्या कालावधीत शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी त्या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.
  •  राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहनानंतर दि. ०१/०५/२०२५ रोजी जाहीर करण्यात यावा. याचबरोबर ०२ मे २०२५ पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरु होईल.
  •  सदर सूचना राज्यमंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या शाळांना लागू असणार नाहीत.

संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. यांचे पत्र ...



परीक्षेचे नावसंकलित चाचणी- २
नियतकालिक मुल्यांकन चाचणी  (PAT -3) / वार्षिक परीक्षा 
परीक्षा दिनांक दि. 08 एप्रिल, 2025 पासून ..
वर्गइयत्ता 5 वी ते  9 वी
मार्गदर्शक अधिकृत वेबसाईटmscepuppss.in/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.