SSC Geography Questionpaper Mar-23 with Model Answer


भूगोल  : बोर्डाची प्रश्नपत्रिका  (मार्च 2023)

(आदर्श उत्तरे )  [ एकूण गुण 40 ] 

दहावी सराव प्रश्नपत्रिका 2023, दहावी सराव प्रश्नपत्रिका 2023 pdf download, नवनीत सराव प्रश्नपत्रिका व कृतिपत्रिका इयत्ता दहावी 2023 pdf, सराव परीक्षा इयत्ता दहावी मराठी 2023, द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका 2023ssc geography question paper 2023 with answers marathi medium

प्र. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा :

(1) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही -------------------- आहेत.

      (i) मुख्य भूभागापासून तुटलेला भूभाग
      (ii) प्रवाळ बेटे
      (iii) ज्वालामुखीय बेटे
      (iv) खंडीय बेटे

उत्तर : प्रवाळ बेटे

(2) ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील --------------- लोकसंख्या असलेला देश आहे.

      (i) कमी
     (ii) मध्यम
      (iii) अत्यल्प
      (iv) सर्वांत जास्त

उत्तर : सर्वांत जास्त

(3) वस्त्यांचे केंद्रीकरण  ------------------ या प्रमुख बाबींशी निगडित असते.

    (i) समुद्रसान्निध्य
   (ii) मैदानी प्रदेश
   (iii) पाण्याची उपलब्धता
   (iv) हवामान

उत्तर : पाण्याची उपलब्धता

(4) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ------------------ प्रकारची आहे.

    (i) अविकसित
   (ii) विकसित
   (iii) विकसनशील
    (iv) अतिविकसित

उत्तर : विकसनशील

प्र.2 योग्य जोड्या जुळवा :

'' स्तंभ

'' स्तंभ

1) ट्रान्स अॅमेझोनियन मार्ग
2) काटेरी व झुडपी वने
3) मैदानी प्रदेश
4) ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ

(i) साग
 (ii) फुटबॉल
 (iii) प्रमुख रस्ते मार्ग
 (iv) खेजडी
(v) पंजाब
(vi) क्रिकेट

 

'' स्तंभ

उत्तरे

1) ट्रान्स अॅमेझोनियन मार्ग
2) काटेरी व झुडपी वने
3) मैदानी प्रदेश
4) ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ

प्रमुख रस्ते मार्ग
खेजडी
पंजाब
 फुटबॉल

प्र. 3. थोडक्यात टिपा लिहा : (कोणत्याही दोन)

 (1) क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य
उत्तर : क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ :
(१) माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी.
(२) स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे
(३) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली.
(४) क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतचि, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे याशिवाय, टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी.

(2) ब्राझीलची किनारपट्टी
उत्तर :
(१) ब्राझीलला सुमारे ७४०० किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे.
(२) उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडो दो नॉर्तेपर्यंतचा किनारा ब्राझीलचा उत्तर अटलांटिकचा किनारा म्हणून ओळखला जातो. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो.
(३) ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर अॅमेझॉन व तिच्या अनेक उपनदया येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजों बेट, माराजों व सावो मारकोस उपसागर आहेत.
(४) ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान व काही मोठ्या नदया येऊन मिळतात. या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी आहेत.

(3) भारतातील खाणकाम. 

उत्तर : भारतातील स्याणकाम व्यवसायाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
(१) भारतातील गटा लागपूरचे पठार स्वनिजांच भांडार म्हणून ओळखले जाते. परिणामी, भारतीय ‌द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातुमिर्मितीच्या उद्योगांचे केंद्रीकरण आलेले आहे
(२) भारतात पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगढमधील कोर्खा भागात कोळशाच्या स्वार्णीचा उदद्योग विकसित झाला आहे.
(3) आसामगध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमध्ये कलौल, कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत. भारताच्या पूर्वेस असणाऱ्या बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखाशी खनिज तेलाचे साठे आहेत.
(४) भारतातील राजस्थान राज्यात संगमरवर दगडाच्या स्वाणी आणि आंध्र प्रदेश राज्यात कडाप्पा दगडाच्या खाणी आढळतात.
(५) राजस्थान राज्यात तांब, शिरो आणि जस्त धातू उदयोमास, कर्नाटक राज्यात लौह-पोलाद, मैंगनीज व अॅल्युमिनिअम धातू उदयोगास आणि तमिळनाडू राज्यात अॅल्युमिनिअम धातू उदयोमास चालना मिळाली आहे.

प्र. 4 (अ) तुम्हांस पुरवलेल्या भारताच्या नकाशा-आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा :

(1) केंद्रशासित प्रदेश – दमण
(2) पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश
(3) शीत वाळवंट
(4) उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश
(5) कन्याकुमारी
(6) चिल्का सरोवर.

प्र. 4 (आ) पुढील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न : (1) ब्राझीलमधील प्रमुख नदी कोणती ?
उत्तर :
ब्राझीलमधील प्रमुख नदी अॅमेझॉन आहे.

(2) ब्राझीलमधील मुख्य बेट कोणते ?
उत्तर :
ब्राझीलमधील माराजॉ बेट हे मुख्य बेट आहे.

(3) उरुग्वे नदी कोणत्या दिशेकडे वाहते ?
उत्तर :
उरुग्वे नदी पश्चिम दिशेकडे वाहते.

(4) साओ फ्रान्सिस्को नदी कोणत्या महासागरास येऊन मिळते ?
उत्तर :
साओ फ्रान्सिस्को नदी दक्षिण अटलांटिक महासागरास येऊन मिळते.

(5) उत्तर अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या कोणत्याही एका नदीचे नाव लिहा.
उत्तर :
उत्तर अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या कोणत्याही एका नदीचे नाव अॅमेझॉन, परानिबा, इटापेकुरू


इयत्ता 10 वी. भूगोल  प्रश्नपत्रिका ( Mar - 2022) pdf


इयत्ता 10 वी. भूगोल प्रश्नपत्रिका आदर्श Mar-22 उत्तरांसह


प्र. 5. भौगोलिक कारणे लिहा : (कोणतेही दोन)

(1) ब्राझीलमधील लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.
उत्तर :
(१) सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाठ्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या.
(२) ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो.
(३) परिणामी, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उदयोगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

(2) ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.
उत्तर : (१) पांढऱ्याशुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, अॅमेझॉन नदीखोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्ये, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उदयाने इत्यादी आकर्षणांमुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे.
(२) पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे अत्यावश्यक आहे.
(३) पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. म्हणून, ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.

(3) हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.
उत्तर : (१) हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान 0° सेपेक्षाही कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बफचि थर आढळतात.
(२) अतिथंड हवामान व बफचि थर यांमुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही.
(३) उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फही वितळू लागते. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे, हिमालयाच्या उप भागात वनस्पतींची संख्या विरळ असते.

(4) ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.
उत्तर : (१) भारतात प्रामुख्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैर्ऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात.
(२) भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैर्ऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगां‌द्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात.
(३) ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागांत पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.

प्र. 6 (अ) पुढील सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख तयार करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

सरासरी आयुर्मान - भारत

वर्षे

१९८०

१९९०

२०००

२०१०

२०१६

सरासरी आयुर्मान

५४

५८

६३

६७

६८

प्रश्न : (1) १९९० मध्ये सरासरी आयुर्मान किती आहे ?
उत्तर : १९९० मध्ये सरासरी आयुर्मान ५८ वर्षे आहे.

(2) कोणत्या दोन दशकात सरासरी आयुर्मानात समान वाढ झाली आहे?
उत्तर : १९८०-१९९० आणि २०००-२०१० या दोन दशकात सरासरी आयुर्मानात समाल चाळ झाली आहे.

(3) १९९० ते २०१६ या काळात सरासरी आयुर्मानात कितीने वाढ झाली?
उत्तर : १९९० ते २०१६ या काळात सरासरी आयुर्मानात १० वर्षांनी वाढ झाली आहे.

किंवा

प्र. 6 (आ) पुढील आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

प्रश्न :

(1) वरील आलेखाचा प्रकार कोणता ?
उत्तर : वरील आलेखाचा प्रकार बहुरेषालेख आहे.

(2) या आलेखात कोणत्या बाबी दर्शवल्या आहेत ?
उत्तर : ब्राझील व भारत या देशांचे एकूण राष्ट्रीय उत्पादन या बाबी आलेखात दर्शवत्या आहेत.

(3) कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे?
उत्तर : १९९० या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे.

(4) २०१० मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती टक्के आहे?
उत्तर : २०१० मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न ५०% आहे.

(5) २००० मध्ये कोणत्या देशाची एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे?
उत्तर : २००० मध्ये भारताची एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे.

(6) २०१६ मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात किती टक्क्यांचा फरक आहे?
उत्तर : २०१६ मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे १६% फरक आहे.

प्र. 7. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : (कोणतेही दोन)

(1) भारत आणि ब्राझील या देशांत नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या.
उत्तर : 

भारतातील नागरीकरण

ब्राझीलमधील नागरीकरण

(१) भारतातील नागरीकरणाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
(२) २०११ च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण हे सुमारे ३१.२ टक्के होते.
(३) भारतात प्रामुख्याने दक्षिण भागात नागरीकरणाचे प्रमाण अधिक आढळते.
(४) भारतातील पर्वतीय प्रदेश वगळता कमी अधिक प्रमाणात सर्वत्र नागरीकरण झाल्याचे आढळते.
(५) भारतातील तमिळनाडू, महाराष्ट्र, ( गुजरात व केरळ ही राज्ये अधिक नागरीकरण झालेली राज्ये आहेत.
(६) भारतातील गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे.

(१) ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.
(२) २०१० च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण हे सुमारे ८४.६ टक्के होते.
(३) ब्राझीलमध्ये प्रामुख्याने दक्षिण व आग्नेय भागात नागरीकरणाचे प्रमाण अधिक आढळते.
४) ब्राझीलमध्ये प्रामुख्याने केवळ आग्नेय भागात नागरीकरणाचे केंद्रीकरण झाल्याचे आढळते.
(५) ब्राझीलमधील रिओ दी जनेरीओ, सावो पावलो व गोइआस ही राज्ये अधिक नागरीकरण झालेली राज्ये आहेत.
(६) ब्राझीलमधील सावो पावलो हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे.

(2) भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.

उत्तर : (१) मारतात सुमारे दीड शतके ब्रिटिशांची राजवट होती
(२) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाले.
(३) स्वातंत्र्यप्राप्तीपासून म्हणजेच १९४७ पासून भारतीय संघराज्याजे संसदीय प्रजासत्ताक शासनप्रणालीचा अवलंब केला आहे.
(४) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षात भारताला तीन युद्‌द्यांजा व अनेक प्रांतांतील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते.
(५) विविध स्वरूपांच्या समस्या असूनही भारत हा जमातील एक प्रमुख विकसजशीत देश आहे.
(६) भारत आज एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो.

(3) क्षेत्रभेटी वेळी नदी प्रदूषण होवू नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल ?
उत्तर :
(१) विनाप्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे, विशेषतः पवित्र ठिकाणी.
(२) कारखान्यांवे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे.
(3) नदीकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नट्यांचे प्रदूषण होऊ नये. यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे. तसेच पथनाट्ये, नाटिका आणि घोषवाक्ये यांच्या माध्यमांतून जनजागृती करणे.
(४) नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नट्यांचे पात्र स्वच्छ करणे इत्यादी

Previous Post Next Post