आजच्या स्पर्धात्मक युगात जाहिरातीला अत्यंत महत्त्व आहे. जाहिरात म्हणजे एखाद्या उत्पादनाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणे होय. जाहिरात ही एक सृजनशील कला आहे आणि ती आत्मसात करणे हे एक कौशल्य आहे.
लोकांच्या मनात एखाद्या उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, त्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे हा जाहिरातीचा मुख्य उद्देश असतो. जाहिरातीने योग्यरीत्या जनमानसावर पकड घेतली की त्या उत्पादनाची विक्री वाढते, हेच उत्तम जाहिरातीचे गमक आहे.
आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट व भ्रमणध्वनी (मोबाइल) यांच्यातील क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा अधिक व्यापक झाली आहे.
जाहिरात म्हणजे काय?
सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण अनेक वस्तू वापरतो. त्या वस्तू आपण निर्माण करीत नाही. म्हणून आपल्या गरजेच्या वस्तूंसंबंधात आपल्याला काही माहिती हवी असते.
- आपल्याला हवी असलेली वस्तू कोण निर्माण करते?
- ती वस्तू आपल्या गरजा किती प्रमाणात भागवते?
- ती वस्तू कुठे मिळते?
- त्या वस्तूची किंमत काय?
वरील माहिती पुरवणारा मजकूर म्हणजे ‘जाहिरात’ होय. आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची माहिती आपल्याला जाहिरातींमार्फत मिळते. म्हणजेच, जाहिरात आपल्याला हव्या असलेल्या वस्तूपर्यंत नेते.
जाहिरातीचे महत्त्व
वस्तूचा निर्माता व ग्राहक यांना जोडून देण्याचे कार्य जाहिरात करते. आपण निर्माण केलेली वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदी करावी, असे प्रत्येक निर्मात्याला वाटत असते. म्हणून जाहिरात आकर्षक करावी लागते.
तसेच, एकाच प्रकारची वस्तू निर्माण करणारे अनेक निर्माते असतात. अशा वेळी आपलीच वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावी, असे प्रत्येक निर्मात्याला वाटत असते. म्हणूनही जाहिरात आकर्षक करावी लागते.
जाहिरात लेखन कसे करावे?
- जाहिरात तयार करताना मथळा व उपमथळा तयार करावा. त्यासाठी सुभाषिते, सुवचने, सुप्रसिद्ध कवितेतल्या वा गाण्यातल्या ओळी, काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी आणि लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग यांचा उपयोग करावा.
- जाहिरातीच्या सुरुवातीला लक्ष वेधून घेणारे शब्द वापरावेत. जसे – खुशखबर, धमाकेदार सेल, एकावर एक फ्री, आधी या आधी मिळवा, 70% सूट इत्यादी.
- जाहिरात कशाची आहे हे ठळकपणे व आकर्षकरीतीने मांडावे.
- आलंकारिक, काव्यमय व प्रभावी शब्दरचनेचा वापर करावा. जाहिरातीची भाषा साधी, सोपी पण वेधक असावी. व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल.
- ग्राहकांची सातत्याने बदलणारी आवड, सवयी, फॅशन्स व गरज यांचे प्रतिबिंब जाहिरातीत दिसायला हवे.
- जाहिरात नेहमी कमीत कमी शब्दांत असावी.
- जाहिरातीला चित्रांची जोड देता आल्यास जाहिरात अधिक प्रभावी होते. मात्र जाहिरातलेखनात चित्रे काढणे किंवा चित्रकलात्मक सजावट करणे अनिवार्य नाही.
- जाहिरातीचे भाषिक रूप महत्त्वाचे आहे. साध्या चौकटीमध्ये योग्य ओळींत केलेली मांडणीही पुरेशी आहे.
- जाहिरातीत संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक (मोबाइल नंबर, ई-मेल आयडी) यांचा स्पष्ट उल्लेख करावा.
जाहिरात लेखनासाठी विचारल्या जाणाऱ्या मूल्यमापन कृती
- शब्दांवरून जाहिरात लेखन.
- जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे.
- विषय देऊन जाहिरात लेखन.
- दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे.
नमुना कृती : ०१
विषय :
तुमची ताई भाजीपोळी छान बनवते. अनेकांनी तिला भाजीपोळी केंद्र चालवण्याचा सल्ला दिला आहे. तिनेसुद्धा आता भाजीपोळी केंद्र चालवण्याचा निर्धार केला आहे. तिच्या या भाजीपोळी केंद्राची जाहिरात करा.
उत्तर :
उत्तर :

If you have any doubts,Please let me know