मराठी वाक्प्रचार : अर्थ व वाक्यात उपयोग
वाक्प्रचार म्हणजे काय? काही शब्दसमूहांचा नेहमीचा शब्दशः अर्थ न राहता रूढीने वेगळा अर्थ व्यक्त होतो, अशा शब्दसमूहांना वाक्प्रचार म्हणतात. वाक्प्रचारांचा योग्य वापर केल्याने भाषा अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण होते.
या लेखात मराठीतील महत्त्वाचे वाक्प्रचार, त्यांचे अर्थ आणि वाक्यातील उपयोग दिले आहेत. अभ्यास करताना प्रथम वाक्प्रचाराचा अर्थ समजून घ्या आणि नंतर तो स्वतःच्या वाक्यात वापरण्याचा सराव करा.
कान धरणे — अर्थ: माफी मागणे. वाक्य: आईने चूक समजावून सांगताच महेशने कान धरले.
नाक मुरडणे — अर्थ: नाराजी व्यक्त करणे. वाक्य: शीतलने रूपाचा नटवेपणा पाहून नाक मुरडले.
वाक्प्रचारांचे अर्थ व वाक्यातील उपयोग
अर्थ: किल्मिष न ठेवणे , मनात डंख न ठेवणे
वाक्यात उपयोग: स्पष्ट बोलणे झाल्यामुळे रघुरावांच्या मनात मनोहरबद्दल कोणतीही अढी नव्हती।
अर्थ: अनादर करणे , अपमान करणे
वाक्यात उपयोग: गुणवान माणसाची अवहेलना करू नये।
अर्थ: विपरीत घडणे , अमंगल घडणे
वाक्यात उपयोग: लग्नानंतर दोन महिन्यांत विधवा झालेल्या सुमनवर जणू अशुभाची सावली पडली।
अर्थ: अंग ( भीतीने ) आक्सून घेणे
वाक्यात उपयोग: गर्दीत घुसलेल्या प्रेक्षकांनी अंग चोरून घेतले।
अर्थ: आवाक्याबाहेरचे काम असणे
वाक्यात उपयोग: आटोक्यात नसलेले काम समीरने अतिशय कष्टाने पूर्ण केले।
अर्थ: शप थ घेणे
वाक्यात उपयोग: कधीही दुष्कृत्य करणार नाही , अशी शिवरामने आण घेतली।
अर्थ: जीवन संपवणे
वाक्यात उपयोग: काही माणसे वाईट व्यसनांनी आपले आयुष्य गमावतात।
अर्थ: खूप कौतुक करणे
वाक्यात उपयोग: परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या शालिनीच्या यशाची सर्व गाव आरती ओवाळत होता।
अर्थ: चांगले काम करण्यासाठी बोलावणे
वाक्यात उपयोग: प्रधानमंत्र्यांनी जनतेला स्वच्छता अभियानासाठी आवाहन केले।
अर्थ: प्रतिस्पर्ध्याला ललकारणे
वाक्यात उपयोग: भैरू पहिलवानाने केरूला कुस्तीसाठी आव्हान दिले।
अर्थ: जबाबदारी झटकणे , निराधार करणे
वाक्यात उपयोग: कर्मचाऱ्यांनी संप करून रस्ता दुरुस्तीचे काम उघड्यावर टाकले।
अर्थ: कृतज्ञता दाखवणे , उतराई होणे. वाक्य ज्यांनी ज्यांनी आपणांस मदत केली , त्यांचे उपकार आपण फेडावेत
वाक्यात उपयोग: आईला वाटेल तसे बोलून कार्तिकने उंबरठा ओलांडला।
अर्थ: मर्यादा सोडणे
वाक्यात उपयोग: आईला वाटेल तसे बोलून कार्तिकने उंबरठा ओलांडला।
अर्थ: खास लक्ष असणे , आग्रह असणे
वाक्यात उपयोग: परीक्षेच्या कालावधीत मोहनचे आरोग्य नीट राहील यावर आईचा कटाक्ष असतो।
अर्थ: वरचढ ठरणे
वाक्यात उपयोग: जुना रेकॉर्ड मोडून सरलाने धावण्याच्या शर्यतीत कडी केली।
अर्थ: पतीला मृत्यू येणे , विधवा होणे
वाक्यात उपयोग: ऐन तारुण्यात मालतीच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले।
अर्थ: प्रतिज्ञा करणे , शपथ घेणे
वाक्यात उपयोग: स्वराज्य स्थापन करण्याचे मावळ्यांनी करी कंकण बांधले।
अर्थ: गुणवत्ता सिद्ध होणे
वाक्यात उपयोग: परीक्षेतच विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कस लागतो।
अर्थ: दृढ निश्चय करणे
वाक्यात उपयोग: या वाक्प्रचाराचा वापर अर्थानुसार योग्य वाक्यात करा.
अर्थ: जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीन स्वरूप धारण करणे
वाक्यात उपयोग: अंगी असलेल्या खोडकरपणाची कात टाकून अरुणने शिस्तीने वागण्याचे ठरवले।
वाक्यात उपयोग: परीक्षेची तयार कशी करावी याचा काकांनी राजेशला कानमंत्र दिला।
अर्थ: जीव कुर्बान करणे
वाक्यात उपयोग: मावळ्यांनी शिवाजी महाराजांवर काया ओवाळून टाकली होती।
अर्थ: जन्म सार्थकी लागणे
वाक्यात उपयोग: उज्ज्वल यश मिळवून अमरने आईची कूस धन्य केली।
अर्थ: धन्य धन्य होणे
वाक्यात उपयोग: मुलाला नोकरी लागलेली पाहून रमाबाई कृतकृत्य झाल्या।
अर्थ: उपकार विसरणे
वाक्यात उपयोग: सुरेशला मदत करणाऱ्यांशीच तो कृतघ्न झाला।
अर्थ: उपकाराची जाणीव असणे
वाक्यात उपयोग: सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांबद्दल जनतेने कृतज्ञ असले पाहिजे।
अर्थ: मनाने ढासळणे
वाक्यात उपयोग: अवेळी आलेल्या पावसाने पिकांची नासाडी झालेली पाहून शेतकरी कोलमडून गेले।
अर्थ: निराश होणे , दीनवाणे होणे
वाक्यात उपयोग: विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येत नसल्यामुळे मधूने खांदे पाडले।
अर्थ: संकटे निर्माण करणे , विघ्न आणणे
वाक्यात उपयोग: गावात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पाला काही माणसांनी खोडा घातला।
अर्थ: नाव कमावणे , प्रसिद्ध होणे
वाक्यात उपयोग: सतत पाच वर्षे शंभर टक्के निकाल लावून आदर्श विदयालयाने ख्याती मिळवली।
अर्थ: प्रसिद्धी होणे
वाक्यात उपयोग: महाराष्ट्र केसरी किताब मिळवल्यामुळे सुधीरचा जिल्ह्यात गाजावाजा झाला।
अर्थ: स्तुती करणे
वाक्यात उपयोग: आई आपल्या लहानग्या सरिताचे नेहमी गुण गाते।
अर्थ: खूप कष्ट करणे
वाक्यात उपयोग: शेतकरी आपल्या शेतामध्ये दिवस-रात्र घाम गाळतात।
अर्थ: पैशांची बचत करणे
वाक्यात उपयोग: शहरात राब राब राबून रामभाऊंनी गावी असलेल्या कुटुंबासाठी चार पैसे गाठीला बांधले।
अर्थ: पूर्ण पराभव करणे
वाक्यात उपयोग: भैरू पहिलवानाने कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला चारी मुंड्या चीत केले।
अर्थ: मग्न होणे , गुंगणे
वाक्यात उपयोग: समोरचे अप्रतिम निसर्गदृश्य बघण्यात मुले चूर झाली।
अर्थ: चेहऱ्यावर भीती पसरणे
वाक्यात उपयोग: पोलिसांना समोर पाहताच चोराचा चेहरा पांढरा फटफटीत पडला।
अर्थ: व्यवस्थित असणे
वाक्यात उपयोग: व्यावसायिकाने आपल्या व्यवसायात अत्यंत चोख असायला हवे।
अर्थ: एकच बाब पुन्हा पुन्हा बोलणे
वाक्यात उपयोग: आपले जीवन सुधारणाऱ्या गुरूंचा महेश सतत जप करीत असतो।
अर्थ: सलगी निर्माण करणे
वाक्यात उपयोग: सुरेशची हुशारी पाहून रमेशने त्याच्याशी सलगी साधली।
अर्थ: मन लावून ऐकणे
वाक्यात उपयोग: पाहुण्यांचे भाषण विद्यार्थी जिवाचा कान करून ऐकत होते।
अर्थ: मनाची तगमग होणे
वाक्यात उपयोग: सहलीला जायला न मिळाल्यामुळे रमाच्या जिवाची उलघाल होत होती।
अर्थ: पराकोटीचे कष्ट करणे
वाक्यात उपयोग: शेतकरी शेतात चांगले पीक येण्यासाठी दिवसरात्र जीव तोडून काम करतो।
अर्थ: चांगले प्रयत्न सतत सुरू ठेवणे
वाक्यात उपयोग: प्रत्येकाने पराकोटीच्या प्रयत्नांची ज्योत तेवत ठेवली पाहिजे।
अर्थ: एकसारखी बडबड करणे
वाक्यात उपयोग: गावावरून आल्यापासून आजीची सारखी टकळी चालली होती।
अर्थ: आडवे-तिडवे बोलणे , अपमानित करणारे शब्द बोलणे
वाक्यात उपयोग: नम्रता येता-जाता सुशीलाला टाकून बोलते।
अर्थ: दुःख दूर करणे
वाक्यात उपयोग: मदर तेरेसा यांनी गरिबांच्या डोळ्यांतले अभू पुसले।
अर्थ: रडू येणे
वाक्यात उपयोग: राधा सासरी निघाल्यामुळे आईचे डोळे पाणावले।
अर्थ: डोळ्यात अश्रू दाटणे
वाक्यात उपयोग: मुलाचे यश पाहून आनंदाने यशोदाबाईचे डोळे भरून आले।
अर्थ: गाऱ्हाणे मांडणे
वाक्यात उपयोग: सदाशिवरावांनी परिसरातील अस्वच्छतेविषयी आरोग्य खात्याकडे तक्रार केली।
अर्थ: समझोता करणे
वाक्यात उपयोग: माधवने नाइलाजाने स्वत: च्या तत्त्वाशी तडजोड केली।
अर्थ: गुंग होणे
वाक्यात उपयोग: गाणे म्हणताना राधाची तंद्री लागते।
अर्थ: एकाच वेळी अनेक कामे सांभाळणे
वाक्यात उपयोग: मोलकरीण रजेवर असल्यामुळे राधिकाला तारेवरची कसरत करावी लागत होती।
अर्थ: पोटभर खाणे
वाक्यात उपयोग: स्वातीच्या लग्नात सुधाकरने जिलेबीवर यथेच्छ ताव मारला।
अर्थ: थोडेसे बोलणे
वाक्यात उपयोग: खोदून खोदून विचारल्यावर अखेर आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध सदाशिवने तोंड उघडले।
अर्थ: धीर धरणे
वाक्यात उपयोग: उत्तुंग यशासाठी माणसाने दम धरला पाहिजे।
अर्थ: धीर सुटणे , हतबल होणे
वाक्यात उपयोग: नदीला आलेल्या पुराचा सामना करता करता गावकऱ्यांचा दम निघून गेला।
अर्थ: खूप दुःख व्यक्त करणे , दुःख अनावर होणे
वाक्यात उपयोग: तरुण मुलगा निवर्तल्याची वार्ता ऐकून आईने दुःखाची किंकाळी फोडली।
अर्थ: लांब जाणे
वाक्यात उपयोग: आजची पिढी भावनिक गोष्टींपासून दुरावत चालली आहे।
अर्थ: जोरात पळून जाणे
वाक्यात उपयोग: पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी धूम ठोकली।
अर्थ: एकाग्रतेने पाहत राहणे
वाक्यात उपयोग: प्रदर्शनातील सुंदर चित्रांवर प्रेक्षकांची नजर खिळून राहिली।
अर्थ: काहीतरी वाईट घडने , विघ्न येणे
वाक्यात उपयोग: नवीन इमारत कोसळली , तेव्हा राधाबाईंना वाटले , कुणाची तरी नजर लागली।
अर्थ: नवे स्वरूप मिळणे
वाक्यात उपयोग: या कंपनीत आपल्याला जरूर नोकरी मिळेल. या आशेने चंद्रकांतच्या मनात नवी पालवी फुटली।
अर्थ: अबू जाणे , बदनामी होने
वाक्यात उपयोग: परीक्षेत नापास होऊन मनूने स्वतःची नाचक्की करून घेतली।
अर्थ: संबंध दुरावणे
वाक्यात उपयोग: ज्या माणसांनी आपल्या सहकार्य केलेले असते , त्यांच्याशी कधी तोडू नये।
अर्थ: जाण्यासाठी परवानगी देणे
वाक्यात उपयोग: गावाला जायला निघालेल्या आजीला बाबांनी आनंदाने निरोप दिला।
अर्थ: एखाद्याच्या पश्चात वाईट बोलणे
वाक्यात उपयोग: कुणाचीही निंदा करणे हे गैर कृत्य आहे।
अर्थ: (कोणत्याही क्षेत्रात / कोणत्याही बाबतीत) पहिले पाऊल टाकणे
वाक्यात उपयोग: शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने रंगमंचावर पदार्पण केले।
अर्थ: आनंददायी गोष्ट असणे
वाक्यात उपयोग: गावची जत्रा म्हणजे गावकऱ्यांना आनंदाची पर्वणी असते।
अर्थ: फजिती होणे
वाक्यात उपयोग: महाराजांनी हल्ला करताच मोगल सैन्याची पळता भुई थोडी झाली।
वाक्यात उपयोग: वर्गात पहिल्या नंबरने पास झालेल्या प्रभाकरची सरांनी पाठ थोपटली।
अर्थ: आधार होणे , धीर देणे
वाक्यात उपयोग: भर संकटात बापू हा रामूच्या पाठीशी उभा राहिला।
अर्थ: सर्वनाशाचा क्षण जवळ येणे
वाक्यात उपयोग: भुरट्या चोऱ्या करणाऱ्या रामूने आपल्या मालकाच्या घरची तिजोरी फोडली , तेव्हा त्याच्या पापांचा घडा भरला।
अर्थ: मृत्यू पावणे
वाक्यात उपयोग: वयाच्या नव्वदाव्या वर्षी अखेर रामभाऊंचे पिकले पान गळले।
अर्थ: बंद पडलेले कार्य पुन्हा सुरू करणे
वाक्यात उपयोग: गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सरकारने पुनर्जीवित केले।
अर्थ: स्तुती करणे
वाक्यात उपयोग: चित्रकलेत प्रथम आलेल्या शीतलची मुख्याध्यापकांनी भरपूर प्रशंसा केली।
वाक्यात उपयोग: सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला क्रिकेटची प्रेरणा दिली।
अर्थ: काटकसर करणे
वाक्यात उपयोग: मासिक पगारातून उदयने नेहमी थोड्या पैशांची बचत केली होती।
अर्थ: भविष्यासाठी संग्रह करणे
वाक्यात उपयोग: उद्योगी मुंग्या कण कण गोळा करून पावसाळ्यासाठी बेगमी करतात।
अर्थ: मनात साचलेले एकदम बोलणे
वाक्यात उपयोग: आपले दुःख रमाबाई भडाभडा बोलून टाकतात।
अर्थ: पुढच्या काळाचा अंदाज बांधणे
वाक्यात उपयोग: तंत्रज्ञानात प्रगती करून शास्त्रज्ञांनी भविष्याचा वेध घेतला।
अर्थ: मग्न होणे
वाक्यात उपयोग: सनसेट पॉइंटवर मुले भान हरपून सूर्यास्त पाहत होती।
अर्थ: घाबरणे. वाक्य अचानक संकट कोसळल्यामुळे महादू अगदी भेदरून गेला
वाक्यात उपयोग: हातावर पोट असणाऱ्या मजुरांना उदद्याची प्रांत असते।
अर्थ: विवेचना (काळजी असणे
वाक्यात उपयोग: हातावर पोट असणाऱ्या मजुरांना उदद्याची प्रांत असते।
अर्थ: विजयी होणे. वाक्य - टी-२० च्या फायनलमध्ये भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर मात केली
वाक्यात उपयोग: आपण ज्या भूमीत जन्म घेतला त्या मातीचे देणे फेडायला हवे।
अर्थ: मातृभूमीचे उपकार फेडणे
वाक्यात उपयोग: आपण ज्या भूमीत जन्म घेतला त्या मातीचे देणे फेडायला हवे।
अर्थ: नाश होणे , विध्वंस होणे
वाक्यात उपयोग: माणसाचा देह नश्वर आहे. शेवटी तो मातीला मिळतो।
अर्थ: आदरपूर्वक सन्मान करणे
वाक्यात उपयोग: स्वातंत्र्यदिनी विदद्यालयातील सर्व विदयार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली।
अर्थ: भावना शब्दांत व्यक्त करणे
वाक्यात उपयोग: आपल्या मनात उमटलेल्या भावना नेहमी कागदावर मुखर कराव्यात।
अर्थ: ठसा उमटणे
वाक्यात उपयोग: मितालीने पोहण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवून स्पर्धेमध्ये स्वतःची मुद्रा उमटवली।
अर्थ: मूळ रुबाब निघून जाणे
वाक्यात उपयोग: शंभर वर्षांनंतर इनामदारांच्या वाड्याची रया गेली।
अर्थ: तल्लीन होणे , आनंदाने गुंग होणे
वाक्यात उपयोग: नाटकातील भूमिका करताना नीलेश अगदी रंगात आला।
अर्थ: नाश होणे
वाक्यात उपयोग: जुन्या बुरसटलेल्या रुढींचा -हास होणे आवश्यक आहे।
अर्थ: नाहीसे होणे
वाक्यात उपयोग: सूर्यप्रकाश पसरताच नदीवर पडलेले धुके लुप्त झाले।
अर्थ: योग्य मार्ग दाखवणे
वाक्यात उपयोग: कानउघडणी करून रामरावांनी महादूला वठणीवर आणले।
अर्थ: प्रशंसा करणे
वाक्यात उपयोग: वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या आलेल्या गणेशची मॅडमनी वर्गात वाखाणणी केली।
अर्थ: लढा देण्यास सुरुवात करणे
वाक्यात उपयोग: पारतंत्र्याविरुद्ध उठाव करण्यासाठी क्रांतिवीरांनी शिंग फुंकले।
अर्थ: जीवदान देणे
वाक्यात उपयोग: सरकारच्या निर्णयामुळे जुन्या सामाजिक हिताच्या योजनांना संजीवनी मिळाली।
वाक्यात उपयोग: मुले नोकरीला लागल्यावर सीताबाईंचा संसार फुलला।
अर्थ: स्वप्न प्रत्यक्षात येणे
वाक्यात उपयोग: भारतीय क्रिकेट संघाने वन-डेमध्ये विश्वविजेते होण्याचे स्वप्न साकार केले।
अर्थ: थक्क होणे , आश्चर्यचकित होणे
वाक्यात उपयोग: दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे स्तिमित झाले।
अर्थ: सीमेबाहेर जाणे (जीवनातून निघून जाणे)
वाक्यात उपयोग: मालकाशी बेइमानी केल्यामुळे लज्जित होऊन पिकू गावातून हद्दपार झाला।
वाक्प्रचार पाठ करताना केवळ अर्थ लक्षात ठेवू नका; प्रत्येक वाक्प्रचाराचा योग्य संदर्भात वाक्यात उपयोग करा. काही वाक्प्रचारांचे अर्थ संदर्भानुसार थोडे बदलू शकतात.
टीप: अभ्यासासाठी दिलेल्या वाक्यांमध्ये मूळ मजकुरातील काही टंकलेखन व भाषिक चुका स्वच्छ करून मांडणी सुधारली आहे.

If you have any doubts,Please let me know