वर्णनात्मक नोंदी |
Varnanatmak Nondi
नमस्कार शिक्षक मित्रहो इ. 1 ली ते इ. 8 वी या वर्गांचा निकाल तयार करताना तसेच
आपल्याला मुलांच्या प्रगतीपुस्तकावर लिहिण्यासाठी आकारिक मूल्यमापन वर्णनात्मक
नोंदी | Formative assessment descriptive records ची
आवश्यकता असते भाषा | मराठी | हिंदी |
इंग्रजी | गणित | विज्ञान
| सामजिक शास्रे | परिसर अभ्यास |
इतिहास | भूगोल | कला |
कार्यानुभव | आरोग्य व शारीरिक शिक्षण |
सर्व विषय | विषयनिहाय | विषयांचे जसे की संकलित मूल्यमापन आकारिक मूल्यमापन यासंदर्भातील
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी आपल्याला नोंदवहीत तसेच प्रगतीपुस्तकावर
द्याव्या लागतात या सर्व नोंदी आपणाकरिता संदर्भ हेतू उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ साली
भारतात लागू करण्यात आला. याच कायद्यांतर्गत २००९-१० या शैक्षणिक वर्षापासून
महाराष्ट्रातील राज्यातील सर्व शाळांत इयत्ता पहिली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण
सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे 'सातत्यपूर्ण
सर्वंकष मूल्यमापन' करणे या संकल्पनेचा शब्दश: अर्थ मुलांचे
सतत व सर्व अंगाने होणारे मूल्यमापन. यात प्रामुख्याने दोन घटकांचा समावेश करण्यात
आला आहे- आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन. आकारिक मूल्यमापन म्हणजे
विद्यार्थी प्रत्यक्ष आकार घेताना (शिकताना) करावयाचे
मूल्यमापन तर संकलित मूल्यमापन म्हणजे सत्राच्या शेवटी केलेली विद्यार्थ्याच्या
संपादणुकीची पडताळणी!
💢आकारिक मूल्यमापन (Formative Evaluation)
(विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन)
सर्व शिक्षकांनी साधने तंत्र उपयोगात आणून वर्गपातळीवर
विद्याथ्यांचे आकारिक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या
संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवाव्यात. सातत्यपूर्ण आकारिक
मूल्यमापनात अभ्यासक्रमात दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते
किंवा नाही, याची नियमितपणे पडताळणी करणारे मूल्यमापन,
वर्षभर अध्ययन-अध्यापनप्रक्रिया सुरू असतांना केले जाणारे मूल्यमापन,
अध्ययनातील प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वीच्या प्रक्रियेची
पडताळणी करणारे मूल्यमापन इत्यादी आकारिक मूल्यमापन होय. विद्यार्थ्याचे
व्यक्तिमत्व आकार घेत आसतना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन. यात खालील साधन
तंत्रांचा वापर केला जातो.
1.
दैनंदिन
निरीक्षण
2.
तोंडीकाम
( प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण संभाषण,
गटचर्चा, मुलाखत इत्यादी. )
3.
प्रात्यक्षिक
/ प्रयोग
4.
उपक्रम
/ कृती
5.
प्रकल्प
6.
चाचणी
7.
स्वाध्याय
8.
इतर : (
प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयं
मूल्यमापन, गटकार्य इ. )
या मूल्यमापनप्रक्रियेसाठी दैनंदिन निरीक्षण, स्वाध्याय (कथा,
निबंध, अहवाल, वर्ण,
पत्र, संवाद, एखाद्या
विषयाची माहिती इत्यादींचे लेखन करणे.), तोंडी परीक्षा,
प्रात्यक्षिक कार्ये, कृतियुक्त कार्ये,
प्रयोगात्मक कार्ये, प्रकल्प, प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, चाचणी (कोणत्याही वेळापत्रकाशिवाय
आणि कोणतीही पूर्व कल्पना न देता अल्प कालावधीत घेण्यात येणारी अनौपचारिक
स्वरूपाची लेखी चाचणी), स्वयं-अध्ययनाद्वारे वैयक्तिक व
गटांत शैक्षणिक उपक्रम राबविणे इत्यादी साधन-तंत्रांचा वापर करावा लागतो.
💢संकलित मूल्यमापन तोंडी/ प्रात्यक्षिक , लेखी
ठाराविक काळानंतर एकञित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित
मुल्यमापन असे म्हणतात. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते. जसे
प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे. व द्वितीय
सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मुल्यमापनात
विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी प्रात्यक्षिक
प्रश्नाचा समावेश करावा..
नोंदीबाबत सूचना :
·
प्रत्येक विदयार्थ्यांच्या प्रत्येक विषयातील प्रगतीच्या नोंदी
सत्रनिहाय कराव्यात.
·
प्रत्येक सत्रासाठी, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी
किमान दोन पृष्ठे वापरावीत..
·
विषयाच्या प्रगती संदर्भातील नोंदी करताना त्या विषयासाठी जी
साधन-तंत्रे निवडलीआहेत ती लक्षात घेऊन नोंदी कराव्यात.
जसे कला विषयासाठी प्रात्यक्षिक / प्रयोग, उपक्रम /कृती,
दैनंदिन निरीक्षण, : तोंडीकाम ही साधन-तंत्रे
निवडली तर कला विषयातील प्रतिसादाच्या नोंदी साधन तंत्रनिहाय कराव्यात म्हणजे कला
विषयाचे प्रात्यक्षिक करताना उल्लेखनीय काय आढळून आले, विदयार्थ्यांच्या
अडचणी कोणत्या ?कला विषयाचे उपक्रमातील सहभागाचे स्वरूप,
नावीन्य कसे आहे? दैनंदिन निरीक्षणातून कोणते गुण दिसून येतात कृतीतील
नावीन्य, स्वतःच्या कल्पकतेचा वापर, उपलब्ध
साधनांचा वापर करून कृती पूर्ण करण्याची धडपड इत्यादी.
तोंडी कामातून कल्पना कशी सुचली ? कृती करताना कोणत्या अडचणी
आल्या, त्यावर मार्ग कसा काढला? कोणकोणत्या
कृती कोणत्या क्रमाने केल्या? इत्यादी.
·
विद्यायांची उल्लेखनीय प्रगती आणि अध्ययनातील त्रुटी, अडचणींच्या
नोंदी कराव्यात.
·
विदयार्थ्यांच्या उल्लेखनीय प्रगतीची दखल घेऊन जाहीर शाबासकी दयावी.
·
नोंदीचे संकलन व वर्गवारीवरून वर्गात एकत्रित मार्गदर्शन / गटात
कार्य/वैयक्तिक मार्गदर्शन / स्वाध्याय, सराव अशा स्वरूपात अतिरिक्त
पूरक मार्गदर्शन करून विद्यार्थ्याच्या अध्ययनातील त्रुटी, अडचणी
दूर कराव्यात.
खालीलप्रमाणे
इयत्तेनुसार काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त
मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी
कराव्यात.
अ.क्र. | विषय | नोंदी |
---|---|---|
1 | मराठी | |
2 | हिंदी | हिंदी आकारिक मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी pdf |
3 | इंग्रजी | इंग्रजी आकारिक मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी pdf |
4 | गणित | गणित आकारिक मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी pdf |
5 | सामान्य विज्ञान / परिसर अभ्यास | सामान्य विज्ञान / परिसर अभ्यास आकारिक मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी pdf |
6 | सामाजिक शास्रे / परिसर अभ्यास | सामाजिक शास्रे / परिसर अभ्यास आकारिक मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी pdf |